महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२३ एप्रिल । उन्हाळ्यात थंड पदार्थ खाणे आणि पिणे सर्वांनाच आवडते. उष्णता कमी करण्याासाठी लोक वेगवेगळ्या पर्यायांकडे वळतात. त्यात कलिंगड या सिझनमध्ये येत असल्यामुळे आणि ते रसाळ असल्यामुळे लोक त्याच्याकडे जास्त खेचले जातात. कलिंगड स्वादिष्ट आणि थंड असण्यासोबतच शरीरासाठी त्याचे भरपूर फायदे आहेत. मात्र, बाजारातून चांगले कलिंगड विकत घेताना बऱ्याच लोकांची फसवणूक होते किंवा बऱ्याच लोकांना कलिंगड कसे ओळखून घ्यायचं हे कळत नाही.
ज्यांना कलिंगडबद्दल जास्त माहिती नसते, ते अनेक वेळा दुकानातून असे फळ आणतात, ज्याचा शरीराला फायदा होत नाही किंवा ते खाण्यास चविष्टही नसतात. पण तुम्हाला माहित आहे का की, असे काही उपाय आहेत जे तुम्हाला योग्य कलिंगड विकत घेण्यासाठी मदत करतील.
असे कलिंगड पहा जे घन किंवा जड वाटेल. तसेच, ज्यामध्ये स्क्रॅच किंवा कट मार्क्स नाहीत. तसेच दुकानातील कलिंगड एकसारख्या आकारेच नसतील, तर तुम्ही समजू शकता की, कलिंगड वाढताना योग्य सूर्यप्रकाश आणि पाणी मिळाले नाही. ज्यामुळे ते एकसारखे नाहीत आणि अशा परिस्थितीत ते आतून कोरडे राहण्याची शक्यता असते. त्यामुळे असे कलिंगड शक्यतो विकत घेऊ नका.
वजनाची तुलना करा
समान आकाराच्या दोन टरबूजांच्या वजनाची तुलना करा. ज्याचे वजन जास्त ते जास्त पिकलेले असते, कारण त्यात जास्त पाणी भरलेले असते. ते चवीलाही सुंदर लागते.
त्यावर हाताने ठोका
प्रत्येकाला नॉकिंगचे तंत्र म्हणजे हाताने ठोकण्याचे तंत्र माहित नाही आणि ते चांगल्याप्रकारे शिकणे खूप कठीण आहे. तरीही, बहुतेक लोक अजूनही या तंत्रावर अवलंबून आहेत.
सर्वोत्कृष्ट कलिंगड निवडण्यासाठी, फळाला काळजीपूर्वक बोटांनी ठोका आणि त्याचा आवाज ऐका. पिकलेले टरबूज अधिक पूर्ण किंवा भरलेलं आवाज करेल आणि जर खूप कमी किंवा खोल आवाज असेल, तर समजा की,कलिंगड कच्चा आहे.