![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२३ एप्रिल । सरकारच्या नव्या नियमानुसार, ज्या व्यक्तीचा एका आर्थिक वर्षात टीडीएस/ टीसीएस २५,००० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असेल अशा सर्वांनी प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही रक्कम ५०,००० रुपयांहून जास्त असल्यास हा नियम लागू होईल. ज्यांच्या बचत खात्यात एका वित्त वर्षांत ५० लाख रु. किंवा त्यापेक्षा जास्त जमा असेल, यात भलेही ते प्राप्तिकराच्या कक्षेत येत नसले तरीही त्यांना रिटर्न दाखल करावे लागेल. यांना दाखल करावे लागेल प्राप्तिकर रिटर्न
१. व्यापाऱ्याची एकूण विक्री/उलाढाल किंवा सकल प्राप्ती ६० लाख रुपयांपेक्षा जास्त असेल.
२. व्यवसायातून सकल प्राप्ती १० लाख रुपयांपेक्षा जास्त असेल.
३. एका वित्त वर्षात टीडीएस आणि टीसीएस २५,००० रु. किंवा त्यापेक्षा जास्त असेल.
४. ६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय आहे आणि टीडीएस-टीसीएस ५०,००० रु.किंवा जास्त असेल.
५. एका वित्त वर्षात बचत बँक खात्यात जमा रक्कम ५० लाख रु. किंवा जास्त असेल. प्राप्तिकर विवरणपत्राचे नवे नियम झाले लागू