PAN Card Apply : इंस्टंट पॅन कार्ड मिळवण्यासाठी अप्लाय कसे कराल ? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४। विशेष प्रतिनिधी । दि.२४ एप्रिल । आधार कार्ड आणि पॅन कार्ड (Pan Card) हे आजच्या काळातील सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे. आधार कार्डचा (Aadhar Card) वापर ओळखपत्र म्हणून केला जातो. तर पॅन कार्डचा वापर आर्थिक दस्तऐवज म्हणून केला जातो. देशात 18 वर्ष झालेली कोणतीही व्यक्ती पॅनकार्डसाठी अर्ज करु शकते. पॅन कार्डचा उपयोग बँक खातं उघडण्यासाठी आणि इतर अनेक आर्थिक कामं करण्यासाठी केला जातो. मुलांच्या शाळा, महाविद्यालयीन प्रवेशापासून सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही आधार कार्डचा वापर केला जातो.

आम्ही तुम्हाला सांगतो की, तुमच्याकडे आधार कार्ड असल्यास पॅन कार्ड मिळवण्यात कोणतीही अडचण येणार नाही. तुम्ही जास्त तपशील न भरता लवकरात लवकर पॅन कार्ड मिळवू शकता. जाणून घेऊया आधार कार्डच्या मदतीनं झटपट पॅन कार्ड कसं मिळवायचं याबद्दल…

इंस्टंट पॅन कार्ड मिळवण्यासाठी फॉलो करा प्रोसेसे :

आधारच्या मदतीनं त्वरित ई-पॅन कार्ड मिळविण्यासाठी, तुम्हाला प्राप्तिकराच्या https://www.incometax.gov.in/iec/foportal अधिकृत वेबसाइटवर क्लिक करावं लागेल.
त्यानंतर तुम्हाला Instant e-PAN या ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.
यावर क्लिक केल्यानंतर Get New PAN ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.
इथे तुम्हाला आधार नंबर द्यावा लागेल. त्यानंतर I Confirm ऑप्शनवर क्लिक करा.
पुढे Continue ऑप्शन वर क्लिक करा.
त्यानंतर तुम्हाला आधार कार्डावर लिंक करण्यात आलेल्या Registered मोबाइल नंबरवर ओटीपी येईल.
त्यानंतर ओटीपी द्या.
पुढे Validate and Continue ऑप्शनवर क्लिक करा
त्यानंतर नियम आणि अटी मंजूर करा आणि पुढे ईमेल आयडी द्या.
त्यानंतर Credentials दाखल करा
पुढे सबमिट बटण दिसेल, त्यावर क्लिक करा.
आधार डिटेल्स सबमिट करण्यासाठी एक्नॉलेजमेंट नंबर जारी केला जातो.
त्यानंतर एक्नॉलेजमेंट नंबर टाका, त्यापुढे आधार नंबर, Captcha Code आणि ओटीपी टाका.
त्यानंतर पुन्हा एक ई-पॅन कार्डची लिंक मिळेल.
यावर क्लिक करुन पासवर्ड (DDMMYYYY फॉर्मेट) मध्ये टाका.
त्यानंतर मिळणारं इंस्टंट पॅन कार्ड डाऊनलोड करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *