महाराष्ट्र २४। विशेष प्रतिनिधी । दि.२४ एप्रिल । पिंपरी-चिंचवड । समाजात असे अनेक बुद्धीमान हिरे आहेत. जे आपल्या कुशाग्र बुद्धीमत्तेच्या बळावर समाजात आपला आगळा वेगळा ठसा उमटवत असतात. आज आम्ही आपणास अशाच एका जिनीअस अवलियाबद्दल सांगणार आहोत. ज्या अवलियाला मास्टर ब्लास्टर, क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याने आपल्या कारकिर्दीत केलेल्या संच्युरीबद्दल इत्यंभूत माहिती आहे. गौरव भंडारी. असे या अवलियाचे नाव आहे. आज दिनांक 24 एप्रिल रोजी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा वाढदिवस त्यामिमित्त आकुर्डी येथील कॅम्ब्रिज इंटरनॅशन स्कूलच्यावतीने डायरेक्टर राम रैना यांनी ही मुलाखत घेतली, केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल पिंपरी चिंचवड कडून मास्टर ब्लास्टर सचिनला अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी कॅम्ब्रीज स्कूलचे रिसर्स फॉर स्टुंडस ऑफ इंटरनॅशनल स्कूल कार्यक्रमास आयोजन करण्यात आले होते.
केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल कडून घेण्यात आलेला या शोमध्ये डायरेक्टर राम रैना यांनी ही मुलाखत घेतली. सचिन तेंडुलकर याने कोणत्या साली किती धावां तसेच कोणत्या मैदानावर सेंच्युरी केली याचा इत्यंभुत तपशील गौरव भांडारी याच्याकडे आहे. यावेळी केम्ब्रिज पिंपरी चिंचवड कडून मास्टर ब्लास्टरला अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देण्यात आल्या..