शिवसेना उपजिल्हाप्रमुख योगेश घारड यांच्यावर गोळीबार, अमरावती जिल्ह्यातील मोर्शी परिसरात तणावपुर्ण शांतता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४। विशेष प्रतिनिधी । दि.२४ एप्रिल । अमरावती (Amravati)मधून एक मोठी बातमी समोर आली आहे. अमरावतीचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख योगेश घारड (Yogesh Gharad) यांच्यावर बेछूट गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. अज्ञातांनी योगेश घारड यांच्यावर बेछूट गोळीबार (firing) केला. या गोळीबारात योगश घारड हे जखमी झाले असून त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयता दाखल करण्यात आले आहे.

योगेश घारड हे वरुड शहरातील मुलताई चौक परिसरात असताना त्यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार करत प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा आणि शिवसेना यांच्यातील संघर्षाने वातावरण तापले आहे. त्यातच राणा दाम्पत्याला काल मुंबई पोलिसांनी अटक केली. त्यानंतर रात्रीच्या सुमारास अमरावतीत शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखावर प्राणघातक हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. तसेच अमरावतीत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, योगेश घारड यांच्या पायाला गोळी लागली असून त्यात ते जखमी झाले आहेत. यानंतर त्यांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी योगेश घारड यांना नागपूर येथे हलविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *