महाराष्ट्र 24 – ऑनलाईन- विशेष प्रतिनिधी -पैठण- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक महिलेच्या जनधन खात्यात ४ एप्रिल रोजी पाचशे रुपये जमा केल्यानंतर पैसे काढण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केल्याचे दिसून आले. 7 एप्रिल किंवा 9 एप्रिल नंतर गर्दी न करता हे पैसे काढण्याचा संदेशही बँकांकडून पाठवण्यात आला होता. पैठण तालुक्यातील बिडकिन येथील बँक आँफ महाराष्ट्रामध्ये नागरिकांनी गर्दी केल्याने सोशल डिस्टेन्सिंगचा फज्जा उडाला आहे. परिणामी नागरिकांनी पैसे काढण्यासाठी तुंबळ गर्दी केल्याने पोलिसांसह प्रशासनाची डोकेदुखी वाढवली आहे.
बिडकीन येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेमध्ये पैसे काढण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती. कुठलीही शिस्त नसल्याने बँकेच्या बाहेर महिलांच्या रांगाच रांगा दिसून आल्या.