महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.२८ एप्रिल । Gold- Silver Price Today : १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ४८,४५० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४८,४५० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६४,७०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.
आजचा भाव?
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४८,४५० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५२,८६० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४८,५०० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,९१० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४८,५०० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,९१० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६५०रुपये आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)