महाराष्ट्र २४। विशेष प्रतिनिधी । दि.३० एप्रिल । यंदाच्या उन्हाळ्याने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी एप्रिल महिन्यात रेकॉर्ड तोडले आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, शनिवार-रविवारी या दोन दिवशी विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) अंदाज पाहता ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, २ मे पासून मुंबईसह (Mumbai) अनेक ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहील आणि हलका पाऊस पडण्याचीही शक्यता आहे.
महाराष्ट्रात जिल्ह्यात सर्वात जास्त तापमान;
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी महाराष्ट्रातील चंद्रपूरमध्ये (Chandrapur) सर्वाधिक उष्णता होती. यावेळी तेथील कमाल तापमान ४६.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. तर दुसरीकडे, महाराष्ट्रातील हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार बहुतांश शहरांमध्ये समाधानकारक ते मध्यम श्रेणीत उष्मा नोंदवला गेला आहे.
शनिवारी मुंबईत कमाल तापमान ३७ आणि किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. तर पुण्यात कमाल तापमान ४० आणि किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. नागपुरात कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २९ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. तर, नाशिकमध्ये कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. औरंगाबादमध्ये कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.