महाराष्ट्र २४। विशेष प्रतिनिधी । दि.३० एप्रिल । आज शुक्रवारच्या तुलनेत सोन्याच्या दरात किंचित वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. शुक्रवारी 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 48 हजार रुपये इतके होते. आज सोन्याच्या दरात किंचत वाढ झाली असून, 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 48550 रुपयांवर पोहोचले आहेत. म्हणेजच आज सोन्यामध्ये प्रति तोळा 550 रुपयांची वाढ झाली आहे. तर 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 52 हजार 970 रुपये इतके आहेत. दुसरीकडे चांदीच्या दरात मात्र घसरण झाली आहे. चांदीचे दर शुक्रवारच्या तुलनेत आज किलोमागे 500 रुपयांनी घसरले असून, आजचा चांदीचा (Silver) दर 63500 रुपये इतका झाला आहे. सोन्याचे दर हे सोनं अधिक दागिन्यांच्या घडणावळीचा दर असा ठरवला जात असल्याने अनेक ठिकाणी त्यामध्ये कमी-अधिक प्रमाणात तफावत आढळून येते.
राज्यातील प्रमुख शहरातील भाव
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार आज राज्याची राजधानी मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 48560 एवढा असून, 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52 हजार 970 रुपये आहे.
पुण्यात 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 48 हजार 420 रुपये असून, 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 53 हजार 20 रुपये आहे.
राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 48 हजार 620 रुपये आहे, तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 53 हजार 20 रुपये इतका आहे.
औरंगाबादमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 48 हजार 590 रुपये असून, 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 53 हजार रुपये आहे.
दुसरीकडे शुक्रवारच्या तुलनेत आज चांदीच्या दरात 500 रुपयांची घसरण झाली असून, चांदीचे दर प्रति किलो 63500 रुपयांवर पोहोचले आहेत.