राज ठाकरे यांच्या सभेला माझ्या मनापासून शुभेच्छा : सुप्रिया सुळे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी। दि.१ मे। माननीय राज ठाकरे यांच्या सभेला माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. राज ठाकरे यांच्या आज औरंगाबाद येथे होणाऱ्या सभेला उद्देशून त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. मुंबईत आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

राज ठाकरेंनी मशींदीवरील भोंग्यांबाबत दिलेल्या अल्टिमेटमवर बोलत असताना त्या म्हणाल्या की, अल्टिमेटम वगैरे असं काही नसतं. मला या शब्दाचा अर्थदेखील माहीत नाही. हे शब्द आमच्या डिक्शनरीमध्ये नाहीत.

कायदा व सुव्यवस्थेवर बोलताना त्या म्हणाल्या की, एक खासदार या नात्याने देशातील कायदा व सुव्यवस्थेमध्ये लक्ष घातले पाहीजे असं मला वाटतं. यावर प्रतिक्रिया देण हे माझं कर्तव्य आहे. महाराष्ट्रात जे घडतय ते वाईटच आहे, पण उत्तरप्रदेश आणि दिल्लीत जे घडलं ते फारच वाईट आहे. मला या घटनांच्या वेदना झाल्या. महाविकास आघाडीचे सरकार ही परिस्थिती सांभाळण्यासाठी सक्षम आहे. असं मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *