Ac Local Train : मुंबई ; एसी लोकलच्या मासिक पासमध्ये सवलत नसल्याचं रेल्वेकडून स्पष्ट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी। दि.२ मे। प्रत्येक सुविधा मोफत मिळावी, ही मानसिकता समाजाने बदलायला हवी. चांगली सुविधा हवी असल्यास त्यासाठी पैसे खर्च करावे लागतील. सुविधा मोफत दिल्यास आपल्या देशाची स्थिती श्रीलंकेसारखी होईल, अशी स्पष्टोक्ती रेल्वे मंडळाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विनयकुमार त्रिपाठी यांनी रविवारी केली. एसी ट्रेनच्या (Ac Local Train In Mumbai) मासिक पासच्या दरात कपात होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वातानुकूलित रेल्वेचा पास हा मोठ्या प्रमाणात अनुदानित आहे. वातानुकूलित लोकलचे तिकीट दर जास्त होते. ती कमी करण्याची मागणी योग्य होती. मेट्रोच्या धर्तीवर हे तिकीट दर असावेत, यासाठी वातानुकूलित तिकिटाचे दर कमी करण्यात आले. यामुळे वातानुकूलित पासचे दर कमी करण्याचा प्रश्नच उदभवत नाही. मासिक पासचा दर आहे तसाच राहणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

चर्चगेट ते विरारदरम्यान अॅप बेस्ड टॅक्सीचे भाडे हे २००० ते २२०० रुपये आहे. या मार्गावरील वातानुकूलित लोकलचा मासिक पास २२०५ रुपये आणि प्रथम श्रेणीचा पास ११८५ रुपये आहे. आरे ते डहाणूकरवाडी या नव्या मेट्रोमध्ये मासिक पास सुविधा अद्याप उपलब्ध झालेली नाही, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

मुंबईकरांमध्ये सुविधांसाठी खर्च करण्याची क्षमता आहे. प्रत्येक सुविधेची एक किंमत असते. मोफत सुविधा दिल्यास अर्थचक्रावर परिणाम होईल. एखाद्या ठिकाणी अतिरिक्त कमाई करून त्याचा वापर अन्य ठिकाणी करताना एवढे दर आकारावे लागतील. अन्यथा अर्थव्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होईल, असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *