महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी। दि.४ मे । जगात कोणतीच गोष्ट फूकट मिळत नाही. डिलिटल जगामध्ये हे खरे होताना दिसते. गुगल, फेसबुक, यूट्यूब आणि ट्विटर सारखी माध्यमे मोफत सेवा देतात असा आपला समज आहे, परंतु या कंपन्या वापरकर्त्यांकडून नाही तर इतर मार्गांनी शुल्क आकारत असतात. मात्र आता ट्विटरने थेट वापरकर्त्यांकडून शुक्ल आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
Ultimately, the downfall of the Freemasons was giving away their stonecutting services for nothing
— Elon Musk (@elonmusk) May 3, 2022
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी अलीकडेच मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर विकत घेतले. यानंतर ट्विटर वापरण्यासाठी पैसे मोजावे लागतील अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती आणि ती आता खरी ठरली आहे. कोट्यवधी युजर्स असणाऱ्या या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मचा वापर करण्यासाठी इथून पुढच्या काळात पैसे मोजावे लागणार आहे. एलन मस्क यांनी ट्विट करून याबाबत घोषणा केली आहे.
अनौपचारिक वापरकर्त्यांसाठी ट्विटर नेहमी विनामूल्य असेल, मात्र व्यावसायिक आणि सरकारी वापरकर्त्यांना कदाचित थोडी किंमत मोजावी लागू शकते, असे ट्विट एलन मस्क यांनी केले आहे. तसेच फूकट सेवांमुळे शानदार सेवांचे पतन होते, असेही त्यांनी दुसऱ्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे.
44 अब्ज डॉलरला खरेदी
21 डिसेंबर 2017. रात्री साडे अकरा वाजता एक अमेरिकन पत्रकाराने ट्विटर खरेदी का करत नाही, असा प्रश्न विचारला होता. तेव्हा ‘मस्क’रीत ट्विटरची किंमत किती असेल? असा सवाल एलॉन मस्कने केला होता. तब्बल 52 महिन्यांनंतर मस्कने मस्करीची कुस्करी केली असून 44 अरब डॉलर्स म्हणजे 3368 अरब रुपयांना ‘ट्विटर’च विकत घेतले आहे. मस्क याच्या खरेदी ऑफरवर दहा दिवस चर्चा सुरू होती. अखेर बोर्डाने ट्विटरची मालकी मस्ककडे सोपवली.
ट्विटर खरेदीचा अंतिम करार झाल्यानंतर एलॉन मस्क यांनी म्हटलेय, अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा लोकशाहीचा पाया आहे. ट्विटर हा डिजिटल टाऊन स्केअर असून मला नवीन सुविधांसोबत कंपनीला पुढे घेऊन जाण्याची इच्छा आहे.