अवघ्या दोन तासांत होणार पुणे ते नाशिक वाहतूक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी। दि.४ मे । नाशिकची (Nashik) द्राक्षे, कांदा आता अवघ्या दोन तासांत पुण्याच्या बाजारपेठ (Pune Market) मिळू शकणार आहेत. हे शक्य होणार आहे ते सेमी हायस्पीड रेल्वेमुळे. (High Speed Railway) पुणे-नाशिक या २३५ किलोमीटर लांबीच्या पट्ट्याचा चेहरा-मोहरा बदलणार आहे.

पुणे आणि नाशिक हा राज्यातील सर्वांत श्रीमंत असा औद्योगिक आणि कृषी पट्टा आहे. या दोन प्रमुख शहरांना हायस्पीड रेल्वेमार्गाने जोडण्यासाठी महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हल्पमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (महारेल) सेमी हायस्पीड रेल्वे उभारणीचा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पास रेल्वे मंत्रालयाने नुकताच ग्रीन सिग्नल दिला आहे. या प्रकल्पामुळे पुणे-नाशिक रस्त्यावरील वाहतूक कमी होण्याबरोबरच वेळ, इंधनाची बचत तसेच प्रदूषण कमी होण्याबरोबरच कृषी व औद्योगिक क्षेत्राला फायदेशीर ठरणार आहे.

या पट्ट्यातील प्रमुख कृषी उत्पादने

पुणे जिल्ह्यातील जुन्नर, नारायणगाव, मंचर, आळेफाटा येथील भाजीपाला, द्रक्षे, कांदा,फळे व फुले देशाच्या विविध भागांत पाठविली जातात

रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूस पन्नास किलोमीटरच्या परिसरात दूध उत्पादन, भाजीपाला, फळे आणि ऊस या प्राथमिक उत्पादक कंपन्यांना फायदेशीर

मंचर, जुन्नर, संगमनेर, सिन्नर येथे उसावर प्रक्रिया करणारे साखर कारखाने आहेत. त्यांना फायदा होणार

विविध कृषी, दूध प्रक्रिया केंद्र व खाद्य प्रक्रिया उद्योगांना चालना

नाशिकमधील ऊस, कांदा अन्य भागात पाठविणे शक्य होणार

रेल्वेमार्गामुळे होणारे फायदे

शेतकऱ्यांना शेतीमाल बाजार समितीपर्यंत पोचविणे शक्य

माल वाहतूक जलद व कमी दरात होणार

नाशवंत मालासाठी पार्सल व्हॅनची सुविधा

पुण्यासह देशातील बाजारपेठेत माल पाठविण्यासाठी मार्ग उपयोगी ठरणार

पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळावर माल पाठविणे शक्य

८० टक्क्यांनी अन्नधान्याच्या वाहतुकीत वाढ होण्याची शक्यता

प्रकल्प उभारणीच्या काळात किमान २५ हजार लोकांना रोजगार मिळणार

जमिनींच्या दरात मोठी वाढ होणार

मार्गावर वीस स्थानके

पुणे, हडपसर, मांजरी, वाघोली, आंळदी, चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, बोटा, साकुर, आंभोरे, संगमनेर, अमोण, नांदूर शिंगोटे, सिन्नर, मोहदरी, वडगाव पिंगला, नाशिक रस्ता.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *