महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी। दि. ५ मे । जगातील सर्वात मोठय़ा आणि 32 वर्षे जुन्या व्हिस्की बॉटलचा लिलाव 25 मे रोजी होणार आहे. ‘द इंट्रेपिड’ नावाने ओळखली जाणारी ही बॉटल 5 फूट 11 इंच उंच आहे. त्यामध्ये 5 किंवा 10 लिटर नव्हे, तर तब्बल 311 लिटर मॅकलन व्हिस्की आहे. तिची गिनिज बुकामध्ये नोंद झाली आहे.
वेल्स ऑनलाइनने केलेल्या दाव्यानुसार, या बॉटलला सर्वात मोठी बोली लागू शकते. ती 14 कोटींहून अधिक किमतीला विकली जाऊ शकते, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याआधी 1926 मध्ये बनवलेल्या व्हिस्कीची बॉटल 14 कोटी रुपयांना विकली गेली होती. असं म्हटलं जातंय की, ‘द इंट्रेपिड’ त्याचाही रेकॉर्ड मोडेल. तसे झाले तर ही जगातील सर्वात महागडी व्हिस्कीची बॉटल ठरेल.