महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी – सलमान मुल्ला । दि. ५ मे । कळंब ।
दयावान प्रतिष्ठान च्या वतीने मंडपाची सोय तर भाजप कडून गुलाबाचे फुल देऊन शुभेच्छा
कोरोनाच्या सावटानंतर दोन वर्षानंतर सर्वत्र रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. कळंब शहरात ईदगाह मैदान येथे ईदनिमित्त सामूहिक नमाज पठण होते व सर्व मुस्लिम बंधू एकमेकांना भेट घेऊन ईदच्या शुभेच्छा देतात साजरी करतात.
याच पार्श्वभूमीवर आज उन्हाची तीव्रता लक्षात घेता दयावान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष इम्रान मुल्ला यांच्या वतीने ईदगाह मैदान येथे मंडपाची सोय व ईदगाह मैदानाची साफ सफाई करण्यात आली होती. याच पद्धतीने ईदची नमाज पठण केल्यानंतर येणाऱ्या मुस्लिम बांधवांना गुलाबाचे फुल देऊन भेट घेऊन ही च्या शुभेच्छा दिल्या..
शुभेच्छा देण्यासाठी भारतीय जनता पार्टी कळंब यांच्यावतीने आयोजन करण्यात आले होते.यावेळी भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष अजित दादा पिंगळे, संदीप बाविकर अमजद मुल्ला शिवाजी गीड्डे, माणिक बोंदर अनंत बोराडे, नारायण टेकाळे, भाऊसाहेब लांडगे, अशोक शिरसागर, विकास कदम, विशाल ठोंबरे, यशवंत रितापुरे,सम्राट गायकवाड, तानाजी चव्हाण,जिवा कुचेकर अलिम दारुवाले फरमान सय्यद,समिर सय्यद, मोहसिन मुल्ला, युवराज पिंगळे,अभय गायकवाड,सलीम बागवान,इम्रान काजी, सिध्दांर्थ सोनवणे,मौलाना आझर,शौकत शेख हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विशेष कष्ट घेतले.