IPL 2022, DC vs SRH : हाय व्होल्टेज ; आज रंगणार दिल्ली विरुद्ध हैदराबाद लढत ; दिल्लीला विजय हवाच

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ मे । DC vs SRH : आज आयपीएलमध्ये (IPL 2022) दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद हे संघ मैदानात उतरणार आहेत. गुणतालिकेत पाचव्या स्थानी असलेल्या हैदराबादला आजचा विजय पुढील फेरीत एन्ट्रीसाठी महत्त्वाचा आहे. तर दिल्लीही चार विजयासंह सातव्या स्थानी असल्याने त्यांनाही स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी आज विजय मिळवणं महत्त्वाचं आहे. आतापर्यंतच्या इतिहासाचा विचार करता दोन्ही संघाचं आव्हान एकमेकांसाठी अवघड ठरलं आहे. एकूण 20 वेळा आमने-सामने आलेले या दोन्ही संघामध्ये 11 वेळा हैदराबाद तर 9 वेळा दिल्लीचा संघ जिंकला आहे. दोघांच्यातील लढती चुरशीच्या झाल्या असल्याने आजचा सामना चुरशीचा होण्याची शक्यता आहे. आजचा दिल्ली कॅपिटल्स (DC) सनरायजर्स हैदराबाद (SRH) यांच्यातील सामना सायंकाळच्या सुमारास होणार आहे. त्यामुळे दव पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा सामना प्रथम गोलंदाजी घेऊ शकतो.

कधी आहे सामना?

आज 5 मे रोजी होणारा दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 7 वाजता नाणेफेक होईल.

कुठे आहे सामना?

हा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न मैदानावर खेळवला जाणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *