कोळसा संकट गडद ; 1,050 रेल्वेफेऱ्या रद्द

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ मे । देशातील कोळसा संकटाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक महत्त्वाची पावले उचलली जात आहेत. दरम्यान, रेल्वेने 1 हजारहून अधिक गाडय़ा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कोळसा रेकच्या वाहतुकीसाठी 24 मे पर्यंत सुमारे 1,050 गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. रद्द करण्यात आलेल्या गाडय़ांमध्ये एक्सप्रेस, मेल आणि पॅसेंजर गाडय़ांचा समावेश आहे. हा बदल तात्पुरत्या स्वरुपात असून कोळसा पुरवठा पूर्ववत झाल्यानंतर सर्व प्रवासी रेल्वे पुन्हा सुरू होणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *