महाराष्ट्र्र २४ – ऑनलाईन : मुंबई: करोना व्हायरसचा आजार राज्यात अधिकच पसरला असून काल एका दिवसात २२९ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळं राज्यातील करोनाबाधितांची संख्या १३६४ वर जाऊन पोहोचली आहे. यात एकट्या मुंबईतील अर्ध्याहून अधिक रुग्णांचा समावेश आहे. मुंबईतील चिंताजनक स्थिती पाहून लॉकडाऊन अधिक कठोर करण्याचा निर्णय सरकारनं घेतला असून त्यासाठी करोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या भागात राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत.
राज्यात आज कोरोनाच्या 229 नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण संख्या 1364 झाली आहे. कोरोनाबाधित 125 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 1142 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak #मीचमाझारक्षक #मैंहीमेरारक्षक
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 9, 2020