महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.१३ मे । ज्या ग्राहकांना बँकेशी संबंधित कामांना सामोरे जावे लागणार आहे, त्यांनी या महिन्यात होणाऱ्या सुट्टीची यादी तपासावी. जेणे करून त्यांना बँकेच्या कामांसंबंधी येणाऱ्या अडथळ्यांना सामोरे जाण्यास मदत होऊ शकेल. दरवर्षी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) भारतीय बँकांची बँक हॉलिडे लिस्ट जारी करू शकते. याद्वारे ग्राहकांना बँका कोणत्या दिवशी बंद राहतील आणि कोणते दिवस उघडतील याचे अपडेट्स अगोदर मिळतात. चला तर मग या महिन्याच्या सुट्ट्यांची यादी तपासू या.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँक सुट्टीची यादी तीन श्रेणींमध्ये विभागली आहे. यामध्ये निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अॅक्ट, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट हॉलिडे आणि बँक्स क्लोजिंग ऑफ अकाउंट्स यांचा समावेश आहे.
मे २०२२ मध्ये बँकेच्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी
१४ मे २०२२: दुसऱ्या शनिवारी बँकांना सुट्टी
१५ मे २०२२: रविवार
१६ मे २०२२: बुध पौर्णिमा
२२ मे २०२२: रविवार
२४ मे २०२२: काझी नजरुल इस्माल यांचा जन्मदिवस – सिक्कीम
२८ मे २०२२: चौथ्या शनिवारी बँकांना सुटी
२९ मे २०२२: रविवार