बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिणी संजिवनी करंदीकर यांचं निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास

Spread the love

Loading

महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.१३ मे । बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिणी संजिवनी करंदीकर (Sanjeevani Karandikar) यांचे निधन झाले आहे. त्या 84 वर्षांच्या होत्या. समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या त्या कन्या तर बाळासाहेब ठाकरे यांच्या लहान बहीण होत्या. वृद्धापकाळामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या त्या आत्या होत्या व किर्ती फाटक यांच्या मातोश्री होत्या. आज सकाळी वयाच्या 84व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. संजीवनी करंदीकर यांचा जन्म पुण्यात झाला होता. रिझर्व बँक ऑफ इंडियामध्ये (RBI) 38 वर्षे मशीन सेक्शन अधिकारी म्हणून त्यांनी काम केले होते. शिवसेनेतर्फे त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त करण्यात आले आहे. प्रबोधनकार ठाकरे (Prabodhankar Thackeray) यांना एकूण आठ अपत्ये होती. त्याच बाळासाहेब क्रमांक पाचवर तर संजिवनी करंदीकर यांचा सातवा क्रमांक होता. आत्या म्हणून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी पाहताना आनंद झाल्याचे त्या म्हणाल्या होत्या.

स्वभाव आणि गंमतीजमती
या आठ अपत्यांपैकी संजिवनी त्या एकट्याच सध्या हयात होत्या. त्यांच्या निधनाने शिवसेनेने दु:ख व्यक्त केले आहे. आत्या म्हणून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी पाहताना आनंद झाल्याचे त्या म्हणाल्या होत्या. उद्धव ठाकरे यांच्यासह आम्हा भावंडांना लहानपणापासून वेगवेगळी नावे पाडली होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर संजिवनी करंदीकर यांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या, त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासंबंधीच्या काही खास बाबी सांगितल्या. यावेळी त्यांनी घरातील विविध माणसांचे स्वभाव आणि गंमतीजमती सांगितल्या. वाचन, रांगोळ्या अशा गोष्टी घरात होत असत. आमच्याकडे प्रचंड वर्तमानमपत्रे, मासिके यायची. त्यामुळे वाचनाचे वातावरण होते, अशा आठवणी त्यांनी सांगितल्या होत्या.

‘घरात कडक शिस्त होती’
आमच्या घरात शिस्त होती. बाळासाहेब ठाकरे आणि माझ्यात सहा वर्षांचे अंतर होते. तर प्रबोधनकार ठाकरे अत्यंत कडक शिस्तीचे होते. आम्हा सर्वांनाच त्याच्याविषयी आदर होता. ते कडक शिस्तीचे होते. सातच्या आत घरात हा सिनेमा आमच्या घरात होता. तर उद्धव ठाकरें यांच्या आईविषयीही त्यांनी आदरभाव व्यक्त केला होता. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री शपथविधीच्या कालावधीत त्यांनी दिलेल्या मुलाखतीत अशा विविध आठवणींना उजाळा दिला होता.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *