महागाईचा दणका ; सीएनजीच्या दरात वाढ; जाणून घ्या नवीन किंमत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ मे । नवी दिल्ली : CNG Price Hike: CNGच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. त्यामुळे महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये सीएनजीच्या दरात 2 रुपयांनी वाढ झाली आहे. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने (IGL)आज रविवार सकाळपासून दिल्ली-NCR मध्ये कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) ची किंमत प्रति किलो 2 रुपयांनी वाढवली आहे.

आता सीएनजीची किंमत किती आहे?
इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने केलेल्या वाढीनंतर सीएनजीची किंमत आता दिल्लीत 73.61 रुपये प्रति किलो, नोएडामध्ये 76.16 रुपये आणि गुरुग्राममध्ये 81.94 रुपये प्रति किलो झाली आहे. दरम्यान, इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने देशाच्या इतर भागातही सीएनजीच्या दरात वाढ केली आहे. हरियाणाच्या रेवाडीमध्ये CNG 84.07 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. त्याच वेळी, कर्नाल आणि कैथलमध्ये 82.27 रुपये प्रति किलो; कानपूर, हमीरपूर आणि फतेहपूरमध्ये सीएनजीची किंमत 85.40 रुपये प्रति किलो आणि अजमेर, पाली आणि राजसमंदमध्ये 83.88 रुपये प्रति किलो झाली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *