सायकलीचा गंज काढण्यासाठी हे करा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ मे । सायकलीला गंज चढला असेल, तर आता काळजी करण्याची गरज नाही. घरी असलेल्या काही गोष्टींच्या मदतीने आपण सायकलवरील गंज अगदी सहज साफ (Clean) करू शकता. काही खास टिप्स आणि ट्रिक्सबद्दल आज तुम्हाला सांगणार आहोत.

या टिप्स वापरुन सायकलवरील गंज अगदी सहज साफ करू शकता.

१. लिंबू आणि बेकिंग सोडा वापरा –

बेकिंग सोडा घराच्या स्वच्छतेसाठी खूप मदत करतो. बेकिंग सोडामध्ये थोडासा लिंबाचा रस मिसळला तर ते चांगल्या प्रकारे स्वच्छ करते. यासाठी पाणी (Water) गरम करून त्यात लिंबाचा रस टाकून घ्या त्यानंतर या मिश्रणात बेकिंग सोडा मिसळा. या पाण्याच्या मदतीने सायकलवरील गंज साफ करा. जुन्या टूथब्रशच्या मदतीने सायकल स्वच्छ करून पाण्याने स्वच्छ धुवा. सायकल पूर्णपणे स्वच्छ होऊन चमकेल.

२. एरोसोल स्प्रे –

मुलांच्या सायकलवर कोणत्याही प्रकारचे डाग किंवा चिन्ह असल्यास ते काढण्यासाठी एरोसोल स्प्रेचा वापर करु शकता. एरोसोल स्प्रेच्या मदतीने गंजाचे डाग सहज काढता येतात. यासाठी गंजलेल्या भागावर एरोसोल स्प्रे करा. काही वेळाने सायकल स्वच्छ कापडाने पुसा.

३. लिंबाचा रस आणि मीठ –

गंजलेल्या भागावर अधिक प्रमाणात मीठ आणि थोडासा लिंबाचा रस लावा. त्याचा जाड थर तयार होऊ द्या. तो थर दोन ते तीन तास राहू द्या. लिंबाच्या साल सायकल घासल्यास लवकर गंज काढतो.

४. अँल्युमिनियम फॉइल आणि पांढरा व्हिनेगर-

पांढरा व्हिनेगर गंज काढून टाकण्याचे काम वेगाने करतो. गंजलेल्या भागाला रात्रभर व्हिनेगरमध्ये बुडवून ठेवा ज्यामुळे गंज सहज निघेल. आपल्याला सायकल व्हिनेगरमध्ये बुडवता येणार नाही, त्यामुळे गंजलेले भाग स्वच्छ करण्यासाठी त्यावर थोडे व्हिनेगर शिंपडून अँल्युमिनियम फॉइल व्हिनेगरमध्ये बुडवा. नंतर ती गंजलेल्या भागावर ठेवा. गंज हलका होत नाही तोपर्यंत अँल्युमिनियम फॉइल स्क्रब करत रहा. थोडा वेळ लागेल परंतु, गंज निघण्यास मदत होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *