महाराष्ट्र २४ ऑनलाईन : पिंपरी चिंचवड – 11 एप्रिल 2020 रोजी क्रांती सुर्य महात्मा जोतिराव फुले यांची १९३ वी जयंती आहे त्या निमीत्त त्यांना शतशः विनम्र अभिवादन करून त्याने थोर विचार थोडक्यात जनतेपर्यंते पोहचा वेत म्हणून हा एक छोटासा प्रयत्न:— महात्मा जोतिराव फुले यानाचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. आयुष्य भर विचारांचीच लढाई लढले. त्यांचे विचार…” समतेतून मानवी स्वातंत्र्या कडे ” नेणारे आहेत. संपुर्ण मानव जातीचा निर्माणकर्ता एकच आहे. एकाच निर्मीणाची आपण लेकरे आहोत. सर्व जाती धर्म हे मानव निर्मित आहेत, त्या मूळे जातिभेद व धर्मभेद यांचा ते धिक्कार करीत. मानवाने आपापल्या स्वार्थी सोयीनुसार धर्म ग्रंथ तयार केले आहेत. धर्म अनेक असले तरी प्रत्येक धर्मात अशी काही समान तत्वे आहेत की ती आपण श्रध्देने च मानायची असतात म्हणून सर्व धर्मां मध्ये जी समान तत्वे आहेत त्यांचे आपण अनुसरण करावे. सर्व जाती धर्म समान मानले तर भांडंण तंटे होणार नाहीत आणी प्रत्येकाची जात व धर्म ही कायम शाबूत राहतील. ते म्हणतात “या विश्वात कोणीही श्रेष्ठ नाही”, ” जन्मजात उच्चनीचतेची कल्पना ” हिच त्यांना मान्य नाही. मनु ष्य हा जातीने,जन्माने वा धनाने श्रेष्ठ व कनिष्ठ ठरत नसुन तो आपल्या कर्मांने,कर्तुत्वने श्रेष्ठ व कनिष्ठ ठरतो. सर्वाना समान न्याय हक्क आणी अधिकार मिळावेत असा त्यांचा निर्धार होता. त्या काळी कनिष्ठ वर्गातील लोकांना व स्रियांना शिक्षणाचे अधिकार नव्हते, ते स्रियांसहीत सर्वानाच असले पाहीजेत, सर्व वर्गासाठी शिक्षणाची दरवाजे खुली असली पहिजेत.एवढच नाही तर प्राथमिक शिक्षण मोफत,सक्तीचे आणी सार्वजनीक व्हावे अशी मागणी त्यांनी सरकार कडे त्या काळी केली होती. शिक्षणा मुळे सर्व सज्ञान होतील. चांगले काय आणी वाईट काय याची जाणीव होइल. शिक्षणात ज्ञानसंचय शिक्षणा बरोबर त्याना व्यवहारीक शिक्षण ही समाविष्ट करावे असे त्यांचा आग्रह होता.कारण उद्योग व्यवसाय करण्या साठी ज्ञानसंचय शिक्षणा बरोबर व्यावहारिकपणा असला पाहिजे, आपल्याला कोणी नाडणार नाही इतपत ज्ञान प्रत्येकाला मिळावे ही त्यांची धडपड होती. “खरे आणी खोटे यांच्यातला फरक ओळखण्यची अक्कल म्हणजे शिक्षण होय. ” असे ते म्हणतात कारण शिक्षणाचा संबंध हा बुद्धीमत्तेशी असतो. स्वता च्या शाळांमधे त्यानी सर्व मुलामुलींना शेती व उद्योगाचे शिक्षण सक्तीचे केले होते. शेत मालाला उत्पादन खर्चावर आधारीत बाजारभाव मिळाला पाहिजे,शेतीला नळाद्वारे पाणी पुरवठा केला पाहीजे त्या साठी विहिरी,तलाव व धरणे बांधावे त शेतकरी बांधवांनी आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शेती बरोबर छोटेमोठे धंदे ,व्यापार , दुध,अंडी,लोकर, दोरी बनवणे. असे पूरक उद्योग सुरु करावेत अस ते सांगत, पाणी आडवा पाणी जिरवा ही योजना राबवण्यचा प्रयत्न त्या काळी जोतिराव फुले नी केला. ते त्या काळचे प्रसिध्द उद्योजक ही होते. पुणे कमर्शियल अँड कॉन्ट्रकक्टीग कंपनीचे ते कार्यकारी संचालक होते. खडक वासला धरण, येरवड्याचा बंड गार्डन पूल व कात्रज चा बोगदा अशी महत्वाची कामे त्यांनी केलीत. ह्या कामांमधे त्यांचे अनेक मित्र संचालक भागीदार म्हणून होते.सदर उद्योग धंद्याची कामे करत असताना सरकारी अधिकारी , कामगार,मजुर-बिगारी यांच्याशी त्यांचा संबंध आला. उद्योगात यशस्वी व्हायचे असेल तर कामगारां मधे मिळुन मिसळून जावे,त्यांच्या अडीअडचणी त्यांची सुखदुःख जाणुन घ्यावीत त्या नुसार त्यांना मदत करावी अशी त्याचे विचार होते. जनताद्रोही चिरीमिरी घेणरया अधिकारी वर्गाचे ते कर्दनकाळ होते. गरीब असो की श्रीमंत प्रत्येकाने विवेक बुद्धि ने वागावे. ध्येयपुर्ण करण्या करिता कृती, विचार,भावना व इछ्या ह्या चार गोष्टी उराशी बाळगाव्यात, कारण मनुष्याचे व्यक्तिमत्व त्त्याच्या विशिष्ट ध्येयानुसारच घडत असते. राजकीय गुलामगिरीपेक्षा समाजिक गुलामगिरी अधिक वाईट होय. माणसाने माणसाशी माणुसकीने वागावे. “परोपकार म्हणजे पुण्य आणी परपीडा म्हणजे पाप” होय असे ते म्हणत……….वरील सर्व विचार महाराष्ट्र राज्य साहित्य आणी संस्कृती मंडळ यांनी प्रसारित केलेल्या ” महात्मा फुले समग्र वाड्मय ” पाचवी आवृत्ती या ग्रंथातून संग्रहीत करून त्या आधारे टिपले आहेत…. पी. के. महाजन.