महाराष्ट्र २४ ; ऑनलाईन ; मुंबई ;कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जगभरातून कौतुक होत आहे. कोरोनाशी लढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी संयम आणि शिस्त सांभाळत महत्वाचे निर्णय घेतले. असं असताना आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज झाल्याची बातमी समोर येत आहे. लॉकडाऊनच्या काळात जिथे पाच लोकांना एकत्र येण्यासही परवानगी नाही अशावेळी वाधवान कुटुंबातील २३ जण खंडाळा ते महाबळेश्वर प्रवास केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाने मुख्यमंत्री नाराज झाले आहेत.
या प्रकरणाची कसून चौकशी व्हावी आणि ज्या विशेष प्रधानसचिवांच्या शिफारशीच्या पत्राने वाधवान कुटुंबियांनी हा प्रवास केला त्या अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे येस बँक घोटाळा प्रकरणातील वाधवान कुटुंबियांना अशी परवानगी मिळतेच कशी? असा प्रश्न तमाम महाराष्ट्राला पडला आहे. (वाधवान कुटुंबीयांना महाबळेश्वरला जाण्यासाठी परवानगी देणारे गुप्ता सक्तीच्या रजेवर)
महत्वाची बाब म्हणजे येस बँकेच्या घोटाळा प्रकरणात कपिल वाधवान आणि धीरज वाधवान वडिल आणि मुलगा या दोघांना विशेष मनी लाँडरिंग प्रकरणात फेब्रुवारी महिन्यात जामीन मंजूर केला होता. यांना आता महाबळेश्वरमध्ये अटक करण्यात आलं असून पाचगणीच्या सेंट झेव्हिअर्स शाळेत क्वारंटाइन करण्यात आलं आहे. या प्रकरणाची आता सीबीआय चौकशी देखील होणार आहे