डॉ. डी. वाय. पाटील कला ,वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यलाय आकुर्डी स्तुत्य उपक्रम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ; ऑनलाईन ; पिंपरी-चिंचवड ;कोरोना व्हायरसच्या संक्रमण रोखण्यासाठी देशभरात जनजागृती पसरवण्यात येत आहे. या लढाईत पोलीस,डॉक्टर, नर्स, सफाई कामगार अतोनात मेहनत घेत आहेत. कोरोनाला हरवण्यासाठी सर्वजण झटत आहेत. अशावेळी प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की कोरोनाच्या लढाईत आपण या सर्व ‘कोरोना कमांडों’ची साथ दिली पाहिजे. आणि ही मदत तुम्ही घरी थांबूनच करू शकता. तरच कोरोनाचं संक्रमण थांबेल आणि देश कोरोनामुक्त होईल. हा संदेश विद्यार्थ्यांना व पालकांना देण्यासाठी डॉ. डी. वाय. पाटील कला ,वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यलाय आकुर्डी येथील प्राचार्य डॉ. स्नेहल अग्निहोत्री व सर्व प्राध्यपकांनी (प्रा. विनिता अरोरा,प्रा.प्रणाली आल्हाट,प्रा.कीर्ती गायकवाड,प्रा.राजश्री देसले,प्रा.वैशाली पिंगळे,प्रा.मेघा गायकवाड,प्रा.किरण पाटील,प्रा.पूजा द्विवेदी,प्रा.स्वाती गोडाळकर, प्रा.तृप्ती राठोर,प्रा.अमृता शिंदे,प्रा.अश्विनी मांडवडे,प्रा.पूनम शिलवंत,प्रा.आरती भांडगे,प्रा.दलजीत कौर सौंद ,प्रा. जसविंदर कौर टोंक) आपापल्या घरी राहून (STAY HOME STAY SAFE) हि कलाकृती बनवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *