भोसरी परिसरातील दानशूर व्यक्तीही देत आहेत मदतीच्या उपक्रमात मोलाच योगदान ; पाचव्या दिवसखेर ५३०० कुटुंबांना मदत पोचली;
महाराष्ट्र २४ ; ऑनलाईन ; पिंपरी-चिंचवड ;‘कोरोना’ विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना दोनवेळच्या जेवणाची भ्रांत निर्माण झाली आहे. अशा नागरिकांवर उपासमारीची वेळ येऊ नये, म्हणून ‘पुन्हा एक हात मदतीचा’ या उपक्रमाच्या माध्यमातून आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी-चिंचवडमधील १० हजार गरजु कुटुंबियांची जबाबदारी स्वीकारली आहे. अशा नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात येणार आहे.
आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.कुटूंबाना मदत करताना शहरातील काही दानशूर व्यक्ती देखील मदतीसाठी सरसावले असून गेल्या पाच दिवसांमध्ये ४२५० कुटुंबांची जबाबदारी ही दानशूर व्यक्तींनी घेतली आहे
आमदार महेश लांडगे म्हणाले की, कोरोनामुळे नागरिकांची दैनंदिन जीवनशैली विस्कळीत झाली आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांना उपासमारीचा सामना करावा लागण्याची भीती आहे. त्यामुळे गरजू कुटुंबियांना मदत करण्यासाठी आम्ही नागरिकांना आवाहन केले आहे. त्याअंतर्गत एका कुटुंबाला मदत करण्यासाठी ४०० रुपयांची मदत करावी, अशी अपेक्षा आहे. तसेच, आर्थिक मदत किंवा जीवनावश्यक वस्तुंचे पॅकेज खरेदी करुन देता येईल. तसेच, पॅकेजची किंमत बँक अकाउंटवर पाठवता येणार आहे.
जीवनावश्यक वस्तुंच्या पॅकेजमध्ये ३ किलो तांदूळ, २ किलो पीठ, १ किलो तुरडाळ, १तेल पॅकेट, १ मीठाचे पॅकेट, ५० ग्राम मिर्ची पावडर, ५० ग्राम हळदी पावडर आदी वस्तुंचा समावेश करण्यात आला आहे.
कोरोना विषाणु संसर्ग लागू केलेल्या लॉकडाउन परिस्थितीत गेल्या १० दिवसांत परिसरातील गरजुंना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत सुरू आहे.गेल्या पाच दिवसात प्रत्यक्षात ७३०० लोकांपर्यत वाटप झाले आहे परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता आपणाकडूनही मदतीची अपेक्षा असून या मदत कार्यात सहभाग घ्यावा, असे आवाहन आमदार लांडगे यांनी केले आहे. त्याचबरोबर खबरदारीचा उपाय म्हणून ही मदत स्वयंसेवकांमार्फत थेट घरी पोचवली जात आहे.काळजी म्हणून सर्वांनी नियमांचे पालन केले पाहिजे. प्रशासनाला सहकार्य करून आपण योग्य ती काळजी घेत घरच्या बाहेर कोणी पडू नये असे सुद्धा आवाहन आमदार लांडगे यांनी केले आहे.
ज्या व्यक्तीस मदत करावयाची असेल किंवा मदत पाहिजे असेल त्यांनी मदतीसाठी संजय पटनी (9822217163) राहुल पाखरे-8856808833/पै आमदार महेशदादा किसनराव लांडगे परिवर्तन हेल्पलाईन सेवा-9379909090 यावर संपर्क साधता येणार आहे.