महाराष्ट्र २४- ऑनलाईन – मुंबई – महामुंबई, पुणे परिसर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची ‘शोकेस’ मानली जाते, त्यामुळे हा विषय केवळ स्थानिक नव्हे तर देशाच्या चिंतेचा ठरला असल्याचे एका जबाबदार अधिकाऱ्याने नमूद केले. महाराष्ट्रातील ७३ टक्के प्रादुर्भाव मुंबई प्राधिकरण क्षेत्रात आहे. पुणे येथे १५ टक्के रूग्ण आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील ६ टक्के रुग्ण ‘मरकज’शी संबंधित असून आता सांगली जिल्ह्यात संसर्गावर नियंत्रण ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्रातील संसर्ग अद्याप नियंत्रणात का आलेला नाही असा प्रश्न केंद्रीय आरोग्य खात्याला तसेच इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्चला पडला असल्याचे एका माहितगाराने सांगितले. केंद्र सरकारने या संदर्भात राज्यांशी सतत संपर्क ठेवला आहे.
अद्याप गुणाकार नाही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कार्यालयाने शक्य ते सर्व प्रयत्न केले जात आहेत, असे केंद्राला कळवल्याचे समजते. महाराष्ट्रातील कोरोना गुणाकार पद्धतीने वाढलला नाही, जगातील अन्य देशांपेक्षा महाराष्ट्रात हे प्रमाण कमी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दुर्धर आजाराने ग्रासलेल्या रूग्णांची संख्या आणि मृतांमध्ये मोठी आहे असेही त्यांनी सांगितले.