प्रवासाची तारीख बदलली तरी कॅन्सल करू नका रिजर्व्हेशन, अशी बदलून मिळेल तिकीटाची तारीख

Spread the love

Loading

महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.१८ मे । अनेकांसाठी प्रवास करताना भारतीय रेल्वे अतिशय सुविधाजनक आणि परवडणारी ठरते. हेच कारण आहे, की दररोज कोट्यवधी प्रवासी ट्रेनमधून प्रवास करतात. लांबचा प्रवास करताना काही महिने आधीच तिकीट बुक करावं लागतं. पण काही वेळा अगदी शेवटच्या क्षणी प्लॅन बदलतो आणि जिथे जायचं असतं तिथे जायची तारीख आधी किंवा नंतर अशी पुढे-मागे होते. प्लॅन पोस्टपोन किंवा प्री-पोन झाला तर तिकीटांचं काय करायचं?

प्रवासाची तारीख अगदी शेवटच्या दिवसांत बदलली आणि तुम्ही तिकीट कॅन्सल करण्याचा विचार करत असाल, तर थांबा. प्रवासाच्या केवळ तारखेत बदल झाल्यास तिकीट कॅन्सल करण्याची गरज नाही. तुम्ही त्याच ट्रेकमधून प्रवास करू शकता. अशावेळी रेल्वेचा नियम माहित असणं गरजेचं आहे.

रेल्वे नियमानुसार, तुम्ही तिकीट कॅन्सल न करता प्रवासाची तारीख पुढे-मागे करू शकता. तारीख बदलण्यासाठी तुम्हाला तुमची आधी ठरलेल्या वेळेतील ट्रेन सुटण्याआधी 24 तास आधी बोर्डिंग स्टेशनच्या स्टेशन मॅनेजर किंवा कंप्यूटर रिजर्वेशन सेंटरवर अर्ज द्यावा लागेल. रेल्वेकडून प्रवासाची तारीख बदलण्याची सुविधा ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे मिळते.

प्रवासाच्या डेस्टिनेशन स्टेशनमध्येही बदल करता येतो. तुमच्यानुसार प्रवासाच्या ठिकाणी बदल करुन तुम्ही प्रवास पुढे करू शकता. यासाठी ट्रेनमध्ये असलेल्या TTE कडून ज्याठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणचं तिकीट खरेदी करावं लागेल. तुमच्याकडे ज्या स्टेशनपर्यंतचं तिकीट आहे, त्याहून पुढे जाण्यासाठी तुमच्या तिकीटापासून पुढील स्टेशनपर्यंतचं तिकीट घ्यावं लागेल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *