राज्यातील 11 शहरांत कमाल तापमान 43 अंशांहून अधिक, सोलापुरात हलका पाऊस झाला

Spread the love

Loading

महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.१८ मे । मान्सून अंदमानात लवकर दाखल झाल्याने दिलासा मिळाला असला तरी विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव, जळगावमध्ये पारा चढलेलाच आहे. राज्यातील ११ शहरांत मंगळवारी कमाल तापमान ४३ अंश सेल्सियसपेक्षा अधिक नोंदले गेले. सोलापुरात सायंकाळी हलका पाऊस झाला. राज्यात यंदा कमाल तापमानाचे दिवस नेहमीपेक्षा अधिक राहिले आहेत. औरंगाबाद, नांदेड, परभणी या ठिकाणी उन्हाचे चटके होते, तर विदर्भात लाही लाही होत होती.

प्रमुख शहरांतील कमाल तापमान : वर्धा ४५.०, अमरावती ४४.६, चंद्रपूर ४४.६, यवतमाळ ४४.५,अकोला ४४.४, ब्रह्मपुरी ४४.३, वाशिम ४४.०, मालेगाव ४३.६, अहमदनगर ४३.४, नागपूर ४३.४, गोंदिया ४३.०, बुलडाणा ४१.८, परभणी ४२.७, नांदेड ४१.८, औरंगाबाद ४१.०, सोलापूर ४०.७, पुणे ३८.१, सातारा ३८.१, सांगली ३७.८, नाशिक ३६.९, कोल्हापूर ३५.४.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *