महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ मे । गडचिरोली पोलीस विभाग (Gadchiroli District Police Department, Police Welfare Branch Gadchiroli) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Gadchiroli Police Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे.पोलीस शिपाई या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून 2022 असणार आहे.
या पदांसाठी भरती
पोलीस शिपाई (Police Constable) – एकूण जागा 136
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
पोलीस शिपाई (Police Constable) –
12th should be passed from its respective boards. {महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत}
तसंच नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेले अनुसूचित जमातीचे(ST) चे उमेदवार किवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा नक्षल विरोधी कारवाईत मृत झालेल्या किवा जखमी झालेल्या पोलीस बातमीदार किवा पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांची मुले असलेल्या उमेदवार जे ७ वि उत्तीर्ण आहेत,ते भरती करिता पात्र ठरतील. व उमेदवार गडचिरोली जिल्ह्याच्या बाहेर बदलीसाठी पात्र ठरणार नाही.
तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
भरती शुल्क
पोलीस शिपाई (Police Constable) –
खुला प्रवर्ग: 450 /- रुपये
मागास प्रवर्ग: 350 /- रुपये
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा पत्ता
गडचिरोली जिल्हयातील प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्र तसेच पोलीस मुख्यालय, गडचिरोली व पोलीस उपमुख्यालय.
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 05 जून 2022
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://gadchirolipolice.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.