दुर्मिळ चहा ; सोन्यापेक्षा 30 पटीने महाग

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ मे । चहा हा अनेक भारतीयांसाठी आवडीचे पेय आहे. दिवस असो अथवा रात्र, कोणत्याही वेळी चहा घेणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. मात्र जर तुम्हाला चहाच्या एका छोट्या पाकिटाची किंमत 10 हजार डॉलर आहे असे म्हटले तर ? तुमचा त्यावर विश्वास बसणार नाही. मात्र हे खरे आहे. दाहुंग पाओ या चहाची किंमत 10 हजार डॉलरपेक्षा ही अधिक आहे. हा जगातील सर्वात महागडा चहा आहे. या चहाची किंमत सोन्याच्या किंमतीपेक्षा ही तीस पट अधिक आहे. तरी देखील अनेक लोक ही किंमत मोजून हा चहा पिण्यास तयार असतात.

दाहुंग पाओ नावाच्या या चहाची झाड अतिशय दुर्मिळ आहेत व त्याची वाढ करण्यासाठी विशेष काळजी घेतली जाते. अनेक वर्षांपुर्वी चीनमध्ये चहाचे उत्पादन करणारे शेतकरी वसंत ऋतूमध्ये डोंगरावर जाऊन चहासाठी पूजा करत असे. सांगण्यात येते की, या चहाच्या पानांना बकरीच्या दुधाने धुतले जाते व त्यानंतर त्यांना शिजवून सुखवले जाते. या सर्व प्रक्रियेस 80 वर्ष लागतात.

चीनमधील लोकांचे म्हणणे आहे की, जर दाहुंग पाओ चहाची पाने खरी असतील तर त्याने अनेक आजार दूर होतात. मींग शासनाच्या काळात महाराणी आजारी पडली होती. त्यावेळी या चहाद्वारेच तीला बरे करण्यात आले. तेव्हा राजाने या चहाची शेती करण्याचे आदेश दिले. सध्या संपुर्ण जगात या चहाची केवळ 6 झाडे आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *