दक्षिण आफ्रिकेशी खेळणार युवा टीम इंडिया : T-20 मालिकेत “या” खेळाडूंना संधी, केएल राहुल कर्णधार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ मे । दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटीच्या यजमानपदासाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. IPL मध्ये आपल्या वेगानं सर्वांना प्रभावित करणाऱ्या उमरान मलिक आणि अर्शदीपला भारताकडून खेळण्याची संधी देण्यात आली आहे. याशिवाय दिनेश कार्तिक आणि हार्दिक पांड्याही दीर्घकाळानंतर संघात पुनरागमन करत आहेत. दिनेश कार्तिकने 27 फेब्रुवारी 2019 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा T20 आंतरराष्ट्रीय खेळला. युवा टीम इंडियाचे कर्णधारपद केएल राहुलकडे सोपवण्यात आले आहे.

दोन्ही संघ पाच T-20 सामन्यांची मालिका खेळणार आहेत. यानंतर भारतीय संघ आयर्लंडला दोन T-20 सामने खेळण्यासाठी जाणार आहे. T-20 विश्वचषकापूर्वी भारतीय निवड समितीने IPL स्टार्सना संधी दिली आहे. ही मालिका म्हणजे जागतिक संघातील प्रवेशाची संधीच आहे.

T-20 संघाव्यतिरिक्त क्रिकेट बोर्डाने इंग्लंड मालिकेदरम्यान कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या एकमेव कसोटीसाठीही संघ जाहीर केला आहे. या मालिकेत भारतीय संघ 2-1 ने पुढे आहे. या कसोटीसाठी रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह यांचा संघात समावेश आहे. त्याला T-20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.

पुजाराला संधी

बऱ्याच दिवसांपासून खराब फॉर्ममध्ये असलेल्या चेतेश्वर पुजाराचे कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. पुजारा सध्या इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळत असून तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे.

इंग्लंड कसोटीसाठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दुल ठाकूर , मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा.

T-20 मालिकेसाठी टीम इंडिया: केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, भुवनेश्वर , रवि कुमार , हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *