आर्यन्स समूहाचे प्रकल्प रोजगार निर्मितीला हातभार लावतील ; यशोत्सवाच्या दुसर्‍या टप्प्याच्या शुभारंभप्रसंगी संचालकांचा विश्वास

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । पुणे । दि. २५ मे ।आर्यन्स समुहाच्या विविध प्रकल्पांतून शाश्वत रोजगार निर्मितीतून राष्ट्रविकासाला हातभार लावला जाणार असल्याची भावना आर्यन्स समूहाच्या संचालकांनी व्यक्त केली.

पुण्यातील आर्यन्स समुहाच्या वतीने विविध प्रकल्पांचा शुभारंभ करण्यासाठी यशोत्सव कार्यक्रम सुरू आहे.याच्या दुसर्‍या टप्प्यात कोथरूड भागातील कलमाडी हायस्कूलच्या शकुंतला शेट्टी सभागृहात नुकत्याच पार पडलेल्या शुभारंभ कार्यक्रमात भारतीय बनावटीच्या कच्च्या मालापासून आयुर्वेदिक कफ सिरप, जीरॅनियम ऑइल, जिंजर ऑइल याची निर्मिती व मनस्मी फिनकॉर्प फायनान्स कंपनी, प्लॅटिनम, चांदी व सोने शुद्धीकरण कारखाना तसेच अलंकार निर्मिती, गेट वे पेमेंटचे ’माय ट्रेझर’ अ‍ॅप अशा विविध प्रकल्पांचे लोकार्पण नुकतेच झाले.

धन्वंतरी सोलवेन्ट्स फार्मास्युटिकल्स या कंपनीतर्फे कोरोना उपचारांवरील औषधीचा महत्वपूर्ण घटक असलेल्या मेंथॉल, हायड्रो ऑक्सी क्लोरोक्विन व डेक्सट्रामेटाफाइन अशा महत्वपूर्ण औषधांची निर्मिती होणार असल्याचे व या क्षेत्रात व्यवसायातून आपोआपच सामाजिक हेतू साध्य होणार आहे.आर्यन्स समूहाच्या वतीने रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचा आनंद असल्याची भावना आर्यन्स समूहाचे संचालक संजय शेंडगे यांनी प्रास्ताविकात नमूद केले.यावेळी मनस्मी फीनकॉर्प फायनान्सद्वारे
कमी व्याजदरात व्यावसायिक, शैक्षणिक, गृहकर्ज दिले जाणार असल्याचे व सुलभ व्यवहारासाठी मल्टिकरन्सी पेमेंटबद्दल आर्यन्सचे सीईओ मनोहर जगताप यांनी सविस्तर माहिती दिली.

 

 ( पुणे – आर्यन्स समुहाच्या धन्वंतरी सॉलव्हट निर्मित फार्मसी प्रकल्पाचे उद्घाटन करतांना मनोहर जगताप, पुष्कर महाजन व संतोष सागवेकर )

 

नॉबेलियम रिफायनरीजचा प्रारंभ-
आर्यन्सकडून सौ.सुनंदा जगताप, स्मिता शितोळे – जगताप, मंजिरी हगवणे, वैशाली वाळुंज, दिपाली जगताप,स्वप्नाली जगताप आणि मीनाक्षी जगताप या गृहलक्ष्मींच्या सामूहिक शुभहस्ते नॉबेलियम रिफायनरी निर्मित सुवर्ण अलंकारांचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमप्रसंगी आर्यन्सचे अध्यक्ष मुकुंद जगताप, सीईओ मनोहर जगताप, ओमा फौंडेशनचे अध्यक्ष अजय जगताप, श्री पलोड, मुकुंद कासट,विजय कासट, शीतल जैन, रत्नागिरी येथील शिवानंद स्वामी व समूहाचे सर्व संचालक यांची विशेष उपस्थिती होती. यशोत्सवच्या दुसर्‍या टप्प्याच्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निखिल जाधव यांनी केले. गुरूराज पोरे यांनी आभार मानले.

( आर्यन्स समुहाच्या नोबेलियम रिफायनरी निर्मित सुवर्ण अलांकराचे अनावरण करतांना सौ. सुनंदा जगताप,स्मिता शितोळे -जगताप,मंजिरी हगवणे, वैशाली वाळुंज, दिपाली जगताप, स्वप्नाली जगताप, मिनाक्षी जगताप आदी.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *