Gold- Silver Price Today : सोने-चांदीच्या दरात सातत्याने तेजी ; जाणून घ्या आजचा दर

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ मे । आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ४७,७६० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४७,१५० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६२,००० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

काय आहे आजचा भाव?
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,७६० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५२,१०० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,८१० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२.१५० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,८१० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,१५० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,८१० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५२,१५० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६२० रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *