महाराष्ट्र २४-ऑनलाईन -मुंबई ; हिंदुस्थानातील कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशभरात लॉकडाऊन जाहीर केला. 23 मार्चपासून देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला असून तेव्हापासून देशातील विमानसेवा, रेल्वेसेवा, सर्व उद्योगधंदे बंद आहेत. जर वेळीच लॉकडाऊनचा निर्णय घेतला नसता तर आजच्या घडीला देशात कोरोनाने हाहाकार माजला असता. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार जर देशात लॉकडाऊन जारी केला नसता तर आता देशात दोन लाख कोरोनाग्रस्त असते अशी धक्कादायक माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
नवी दिल्ली येथे आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत आरोग्य विभागाचे सहसचिव लव अगरवाल यांनी ही माहिती दिली आहे. ‘लॉकडाऊन व परिसर सिल करणे हे या लढ्यात महत्त्वाचे आहे. जर आपण असं केलं नसतं तर आता देशात दोन लाखांहून अधिक रुग्ण असते.’ असे लव अगरवाल यांनी सांगितले. सध्या देशात कोरोनाचे 7447 कोरोनाग्रस्त असून 239 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 642 जण कोरोनामुक्त झाले आहेत.