Central Government Employee : केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ; पगार किती वाढणार?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ जून । केंद्र सरकारच्या (Central Government) कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 7 व्या वेतन आयोगानुसार केंद्र सरकारने 3 टक्के महागाई भत्ता (DA) वाढ जाहीर केली आहे. महागाई भत्त्यातील ही वाढ 1 जुलैपासून लागू होणार आहे. या वाढीचा परिणाम त्यांच्या पगारवाढीत दिसून येणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (Dearness allowance) वाढ करण्याची घोषणा सरकारनं मार्चमध्ये केली होती. एप्रिल महिन्याच्या पगारासोबत तीन महिन्याच्या पगारासह तीन महिन्यांची थकबाकी देण्याचंही अर्थ मंत्रालयाकडून (Finance Ministry) सांगण्यात आलं होतं. आता जुलैमध्ये पुन्हा एकदा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होणार असल्यामुळे त्यांच्या पगारात घसघशीत वाढ होणार आहे.

महागाई भत्त्यात 13 टक्के वाढ
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 13 टक्के वाढ करण्यात आलीय. महत्वाची बाब म्हणजे कर्मचाऱ्यांच्या खात्यावर नवीन डीएनुसार पगार चालू महिन्यापासूनच जमा होणार आहे. केंद्र सरकारमधील काही विभागात अजून सातव्या वेतन आयोगानुसार लाभ मिळत नाही. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं हे महत्वाचं पाऊल उचललं आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 5 व्या वेतन आयोगानुसार पगार असणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए टक्क्यांपर्यंत वाढणार आहे.

3 महिन्याची थकबाकीही मिळणार
सहाव्या वेतन आयोगानुसार लाभ मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांचा डीए 196 टक्क्यांवरुन 203 टक्के होणार आहे. यात केंद्र सरकारनं डीएमध्ये 7 टक्क्यांची वाढ केली आहे. जानेवारी 2022 पासून कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे. त्यांना 3 महिन्याची थकबाकीही मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *