एक जून म्हणजे वाढदिवस दिन ; अनेकांचा वाढदिवस असण्याचं कारण काय?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ जून । आज एक जून (1st june) . या दिवशी आपल्या आजूबाजूला अनेकांचा वाढदिवस असतोच. सोशल मीडियावर असणाऱ्या जवळपास प्रत्येकाच्या अकाउंटशी 1 जून रोजी वाढदिवस (June 1 Birthdays) असणारे शेकडो फ्रेंडस जोडलेले असतात. अशावेळी सर्वांचे वाढदिवस एकत्र जल्लोषात साजरा केला जातो.

जुन्या पिढीतील कित्येक लोकांची ऑन रेकॉर्ड जन्मतारीख म्हणजे एक जून. अनेकांचे आई-वडील, आजी -आजोबा, मित्राचे आई- बाबा, मैत्रिणीचे मावशी-काका, ओळखीपाळखीचे यांच्यापैकी कोणाचा ना कोणाचा वाढदिवस 1 जूनला असतोच. फेसबुकवर वरची फ्रेण्डलिस्ट चेक केली तर त्यातही कितीतरी जणांचे आज वाढदिवस असल्याचं दिसून येतो. दरवर्षी 1 जून रोजी वाढदिवस साजरा करणाऱ्यांची संख्या मोठी असते.

याच्यामागाचे नेमकं कारण

पूर्वी जन्म-मृत्यूच्या तारखेची नोंदणी करण्याबाबत एवढी जागरूकता नव्हती. तेव्हा आपले मूल कोणत्या दिवशी, कोणत्या तारखेला जन्माला आले हे अनेक आईवडिलांच्या लक्षातही नसायचे. पुढे ही मुले जेव्हा मोठी झाली, शाळेत जाण्याची वेळ आली तेव्हा अनेकांना आपली जन्मतारीखच माहिती नसायची. तेव्हा अशा मुलांना शिक्षक 1 जून ही जन्मतारीख देत. त्यामुळे शाळेत प्रवेश घेणे सोपे होई. काहींचे वडील फिरतीची आणि बदलीची नोकरी करणारे होते. त्‍या गोंधळात महत्त्वाची कागदपत्रे देखील हरवायची. त्यामुळे मुलांच्या जन्मतारखेची नोंद असलेली कागदपत्रेही सापडायची नाहीत. पुढे शाळेत किंवा नोकरीच्या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करताना अडचणी यायच्या. त्यामुळे ही मुले कोणत्याही महिन्यात जन्मलेली असली तरी सबळ पुरावा नसल्याने त्यांची जन्मतारीख 1 जूनच केली जायची. त्यामुळे अनेकांचा वाढदिवस 1 जूनला येतो. (why many people celebrates birthday on 1st june)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *