Gold Silver Rate ; सोने चांदीच्या दरात घसरण ; पहा आजचा भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ जून । गेल्या काही दिवसापासून सोने आणि चांदी्च्या दरात चढ उतार दिसून येत आहे. सध्या लग्नसराई संपत आल्याने सोन्याचे भावातही घसरण झाली आहे. आज सोन्यासोबतच चांदीच्या दरातही घसरण नोंदवण्यात आली आहे. या घसरणीनंतर गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार आज 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47500 रुपये तर 24 कॅरेट साठी 51,820 रुपये आहे तर चांदीच्या दरातही थोडी घसरण झाली असून 10 ग्रॅम चांदीचा दर आज 606 रूपये आहे.

बुधवारलाही सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण झाली होती. 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47,740 रुपये तर 24 कॅरेट साठी ₹ 52,090 रुपये होती तर चांदीच्या दरातही थोडी घसरण होत 10 ग्रॅम चांदीचा दर 612 रूपये होता. (gold silver rate todays update 2 june 2022)

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई – 51,700 रुपये

दिल्ली – 51,810 रुपये

हैदराबाद – 51,810 रुपये

कोलकत्ता – 51,810 रुपये

लखनऊ – 51,960 रुपये

मुंबई – 51,810 रुपये

नागपूर – 52,860 रुपये

पूणे – 52,860 रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *