Fish Rate :आवक घटल्यामुळे मासळीने भाव खाल्ला ; किलोमागे 300 ते 500 रु. वाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ जून । सरकारने 1 जूनपासून 31 जुलै दरम्यान सलग 61 दिवसांसाठी खोल समुद्रातील पावसाळी मासेमारी बंदीच्या दिलेल्या आदेशानंतर राज्यातील (State) मासेमारी ठप्प झाली आहे. यामुळे उरण परिसरातील सुमारे 750 मच्छीमार नौकांनी विविध बंदरांत नांगर टाकून त्या विसावल्या आहेत. त्यामुळे मासळीची (Fish) आवक मोठ्या प्रमाणावर घटली असल्याने मासळीचे भाव (Rate) सामन्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. पापलेट, सुरमईने भाव खालल्ला असून 800 रुपये किलोने मिळणारे पापलेट बाराशे ते पंधराशे रुपये झाले आहेत. तर सहाशे रुपये किलोने मिळणारी सुरमई नऊशे ते हजार रुपये झाली आहे.

सरकारने 1 जूनपासून 31 जुलै दरम्यान सलग 61 दिवसांसाठी खोल समुद्रातील पावसाळी मासेमारी बंदीच्या दिलेल्या आदेशानंतर राज्यातील (State) मासेमारी ठप्प झाली आहे. यामुळे उरण परिसरातील सुमारे 750 मच्छीमार नौकांनी विविध बंदरांत नांगर टाकून त्या विसावल्या आहेत. त्यामुळे मासळीची (Fish) आवक मोठ्या प्रमाणावर घटली असल्याने मासळीचे भाव (Rate) सामन्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. पापलेट, सुरमईने भाव खालल्ला असून 800 रुपये किलोने मिळणारे पापलेट बाराशे ते पंधराशे रुपये झाले आहेत. तर सहाशे रुपये किलोने मिळणारी सुरमई नऊशे ते हजार रुपये झाली आहे.

पावसाळी मासेमारी बंदी लागू झाल्यानंतर दोन दिवसांतच मासळीची आवक मोठ्या प्रमाणावर घटली आहे. मासळीची आवक घटल्याने मासळीचा तुटवडा जाणवतो आहे. मासळीची आवक घटल्याने दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मासळीचे भाव चांगलेच कडाडले असल्याची माहिती मासळी व्यावसायिक हेमंत गौरीकर यांनी दिली आहे. परराज्यातून येणाऱ्या चांगल्या प्रतीच्या मासळीचे भावही सामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने खवय्यांच्या खिशाला चांगलीच चाट बसत असल्याची माहिती करंजा मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र नाखवा यांनी दिली आहे.

मोठ्या प्रमाणात परिणाम
मासमेमारी बंदीचा मोठ्या प्रमाणात परिणाम दिसून येतो आहे. खोल समुद्रातील मासेमारी बंद झाल्याने आता स्थानिक मच्छीमारांकडून बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या मांदेली, बोंबील, निवठ्या, भिलजी, कोळीम, बळा, खेंगट, खुबे, कालवे, चिंबोरी, मुठे, किळशी, चिंबोरी, मुठे, किळशी, ढोमी, चिवणी, कोळंबी, वाकटी, बांगडे, तळ्यातील गोडी मासळी आणि सुकी मासळी येऊ लागली आहे. या मासळीवर आता खवय्यांना ताव मारावा लागणार आहे.

काय आहेत दर?
उरण परिसरातील सुमारे 750 मच्छीमार नौकांनी विविध बंदरांत नांगर टाकून त्या विसावल्या आहेत. त्यामुळे मासळीची आवक मोठ्या प्रमाणावर घटली असल्याने मासळीचे भाव सामन्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. पापलेट, सुरमईने भाव खालल्ला असून 800 रुपये किलोने मिळणारे पापलेट बाराशे ते पंधराशे रुपये झाले आहेत. तर सहाशे रुपये किलोने मिळणारी सुरमई नऊशे ते हजार रुपये झाली आहे.

मासमेमारी बंदीचा मोठ्या प्रमाणात परिणाम दिसून येतो आहे. खोल समुद्रातील मासेमारी बंद झाल्याने आता स्थानिक मच्छीमारांकडून बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या मांदेली, बोंबील, निवठ्या, भिलजी, कोळीम, बळा, खेंगट, खुबे, कालवे, चिंबोरी, मुठे, किळशी, चिंबोरी, मुठे, किळशी, ढोमी, चिवणी, कोळंबी, वाकटी, बांगडे, तळ्यातील गोडी मासळी आणि सुकी मासळी येऊ लागली आहे. या मासळीवर आता खवय्यांना ताव मारावा लागणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *