जवान विपुल इंगवले यांचे निधन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ जून । सियाचिनमध्ये कर्तव्य बजावत असताना बर्फवृष्टीत सापडल्याने जखमी झालेल्या तालुक्यातील भोसे येथील जवान विपुल दिलीप इंगवले यांचे पुणे येथील लष्करी रुग्णालयात काल उपचारादरम्यान निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

मागीलवर्षी सियाचिनमध्ये कर्तव्यावर हजर असताना, बर्फवृष्टीमध्ये सापडल्याने ते जखमी झाले होते. त्यांच्यावर प्रारंभी दिल्लीत व त्यानंतर पुणे येथील सैन्यदलाच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, सहा महिन्यांची मुलगी, आई, वडील, दोन बहिणी व भाऊ असा परिवार आहे. त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या कोरेगाव येथील डी. पी. भोसले कॉलेजमध्ये पदवीचे शिक्षण घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *