टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व मद्यविक्री बंद

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मुंबई – टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व मद्यविक्री बंद आहेत. 12 एप्रिल 2020 ला राज्यात 64 गुन्हे नोंदविण्यात आले असून 34 जणांना अटक करण्यात आली आहे. 11 वाहने जप्त करण्यात आली असून18 लाख रुपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर 24 मार्च ते 12 एप्रिल पर्यंत पूर्ण टाळेबंदी कालावधीमध्ये राज्यात 2 हजार 447 गुन्हे नोंदविण्यात आले असून 971 जणांना अटक करण्यात आली आहे. 126 वाहने जप्त करण्यात आली असून 5 कोटी 89 लाख रुपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्यातील ‌सर्व मद्यविक्री बंद असून अवैध मद्य निर्मिती, वाहतूक, विक्री विरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाची राज्यस्तरावर निरंतर कारवाई सुरूच आहे. अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री विरुद्ध तक्रार स्वीकारण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा 24×7 नियंत्रण कक्ष सुरू आहे.

सदर नियंत्रण कक्षाचा टोल फ्री क्रमांक 18008333333 तर व्हाट्सअँप क्रमांक 8422001133 आहे. यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते.
सदर नमूद क्रमांकावर अवैध मद्य बाबतची तक्रार नोंद करण्यात यावी, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क नी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *