देहूतल्या कार्यक्रमात अजित पवार यांना भाषणाची संधी नाही ; पंतप्रधान मोदीही म्हणाले, ‘दादांना बोलू द्या’

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१४ जून । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते आज देहूत शिळा मंदिराचं लोकार्पण झालं. यावेळी आयोजित कार्यक्रमात विरोधी पक्षनेते फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित वारकऱ्यांना संबोधित केलं. मात्र मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषणाची संधी दिली गेली नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानंतर थेट पंतप्रधान मोदींचं भाषणासाठी नाव पुकारलं गेलं. यावेळी मोदींनीही ‘अजितदादांना बोलू द्या’, असा इशारा केला. पण कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाने थेट मोदींचं नाव घेतल्याने ते भाषणासाठी डायसकडे गेले. अधोरेकित करण्यासारखी गोष्ट म्हणजे राज्यातल्या सरकारचे प्रतिनिधी, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजितदादांची कार्यक्रमाला उपस्थित होती. पण असं असतानाही अजितदादांना बोलू न दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

देहूत शिळा मंदिराचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते आज लोकार्पण झालं. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते. प्रास्ताविक झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ५ मिनिटांमध्ये भाषण केलं. त्यानंतर सूत्रसंचालकाने भाषणासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव पुकारलं. यावेळी मोदींनीही अजितदादांना बोलू द्या, असा इशारा केला. पण अजितदादांनी देखील ‘तुम्ही बोला’ म्हणत मोदींना खुणावलं. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाने थेट मोदींचं नाव घेतल्याने त्यांना भाषणासाठी डायसकडे जावं लागलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *