भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या कडून उद्धव ठाकरेंना फोन, हे आहे कारण..

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१७ जून । शिवसेना एनडीएमधून (nda) बाहेर पडली होती. त्यानंतर आता पहिल्यांदाच भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांना फोन करण्यात आला आहे. राष्ट्रपती निवडणुकीसाठी (President Election 2022) भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह ( BJP leader Rajnath Singh) यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या राजकीय घडामोडी वेग आला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरच चर्चा केली. राष्ट्रपती निवडणूक संदर्भात राजनाथ सिंह यांनी फोनवरून चर्चा केली. राष्ट्रपती निवडणुकीत NDA च्या उमेदवाराला सहकार्य करण्या संदर्भात चर्चा झाल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती दिली आहे.

राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. आगामी राष्ट्रपती निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळेच राजनाथ सिंह यांनी सर्वात आधी ममता बॅनर्जी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत चर्चा केली. या बैठकीत मल्लिकार्जुन यांनी भाजपचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्या नावावर चर्चा करु, असं राजनाथ यांना सांगितलं.

राजनाथ सिंह यांनी ममता आणि मल्लिकार्जुन यांच्यासोबतच्या बैठकीनंतर सपा नेते अखिलेश यादव यांच्यासोबतही फोनवर बातचित केली. राजनाथ सिंह यांनी बीजेडी प्रमुख नवीन पटनायक, तसेच एनडीएचे सहयोगी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशीही चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर राजनाथ सिंह यांनी राष्ट्रपती निवडणुकीबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि बसपाच्या नेत्या मायावती यांच्याशी चर्चा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *