महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१८ जून । आपल्या देशाचा कारभार चालवण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना पर्यायी एकच चेहरा आहे ज्याच्याकडे सत्ताधारी सोडले तर सर्व जनता मोठ्या आशेने बघत आहे. तो चेहरा म्हणजे माननीय शरद पवार ज्यांचा पक्ष इतरांच्या तुलनेत लहान जरी असला तरी त्यांचा राजकारणाचा दीर्घका काळाचा अनुभव देशातले अनेक महत्वाची खाती सांभाळण्याचा अनुभव व संकटांशी सामना करून त्यातून पर्यायी योग्य असा मार्ग काढून सर्वाना बरोबर घेऊन काम करण्याची शैली पाहता ते सोडून दुसरा सक्षम चेहरा समोर दिसत नाही. महाराष्ट्र राज्याला देशात सतत सतत सुजलाम सुफलाम ठेवण्यात व आर्थिकदृष्टय़ा देशात नंबर 1 ठेवण्यात पवार साहेबांचा सिंहाचा वाटा आहे म्हणुन देशाला पर्यायी नेतृत्व म्हणुन जनतेतून शरद पवार नावाची चर्चा उदयाला येत आहे. येणार्या 2024 च्या निवडणुकीत त्यावर शिक्कामोर्तब झाले तर देशाला पर्यायी नेतृत्व मिळणार आहे.
जे नेतृत्व पुरोगामी विचारां बरोबर हिंदुत्वा सहित सर्व जाती धर्माचा विचार करणारे नेतृत्व आहे. महाराष्ट्रात जसे सर्व जाती धर्मभाव सहीत पुरोगामी विचारांची सांगड घालून तीन पक्षांना एकत्र आणून यशस्वीपणे पर्यायी सरकार चालवत आहेत. त्याच धर्तीवर देशातील सर्व राज्यात व केंद्रातही भक्कम असे पर्यायी सरकार ते देवू शकतात. हीच गोष्ट सध्याच्या विद्यमान केंद्र सरकार च्या व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लक्षात आल्या मुळे शरद पवारांना बदनाम करण्या चे काम सुरू केले आहे. जनतेत पवारांची प्रतिमा कशाप्रकारे मलीन करता येईल म्हणुन पवारांचे दहशतवाद्यांशी संबंध आहेत अशी गंभीर आरोपाची बातमी जनमानसात पसरवली जात आहे. जेणेकरून पवारांचे नावच पर्यायी नेतृत्व राहणार नाही.परंतु जनतेने ठरवले तर देशाला पर्यायी नेतृत्व म्हणून शरद पवारांचे नाव पुढे येवू शकते .कारण सक्षम विरोधीपक्ष म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते तो काँग्रेस पक्ष सध्यातरी भक्कम असे नेतृत्व देवू शकत नाही. म्हणुन देशाला पर्यायी नेतृत्व करणारा असा नेता पाहिजेच. देशाला पर्यायी नेतृत्व समोर असेल तरच विद्यमान सरकार लोकशाही पद्धतीने काम करीत असते. आमच्या शिवाय कोणीच नाही असा भ्रम ज्या वेळी विद्यमान सरकारचा होतो त्या वेळी पासून हुकुमशाही ने कामकाज करण्याची पद्धत सुरू होते. परिणामी देशात आर्थिक, सामाजिक व राजकीय विषमता तयार होते ज्या देशाचे भवितव्यच धोक्यात येवू शकते. पी. के. महाजन.