दिल्लीला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाला आग; थरारक व्हिडिओ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१९ जून । काल शनिवारी पटनाहून दिल्लीला (Delhi) जाणाऱ्या स्पाइसजेट विमानाच्या इंजिनला आग लागल्याने पाटणा विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. सर्व प्रवाशांना विमानातून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. यात १९१ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्पाइसजेट 737-800 विमानाच्या डाव्या इंजिनला टेकऑफनंतर काही मिनिटांत आग लागल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विमानाने उड्डाण करताच त्याच्या एका इंजिनमधून धूर निघताना दिसला. यानंतर विमानाने विमानतळावर सुरक्षित लँडिंग केले. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. विमानाच्या इंजिनमध्ये आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही.

आग लागल्याची माहिती स्थानिकांनी दिली, त्यानंतर विमान सुरक्षितपणे पाटणा विमानतळावर उतरवण्यात आले. विमान वाहतूक नियामकाच्या माहितीनुसार, पक्ष्यांच्या धडकेमुळे इंजिनला आग लागली. या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

“विमानात आग लागल्याची माहिती स्थानिक लोकांनी जिल्हा आणि विमानतळ प्राधिकरणाला दिली होती. सध्या सर्व प्रवासी सुखरूप आहेत. कारण विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. अभियंत्यांची टीम पुढील विश्लेषण करत आहे, अशी माहिती पाटणा डीएम चंद्रशेखर सिंह यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *