महाराष्ट्रात महाविकास आघाडीसाठी धोक्याची घंटा ? एकनाथ शिंदें नॉट रिचेबल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२१ जून । विधानपरिषद निकालानंतर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे पहिल्या फळीतील नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे निवडणुकीनंतर नॉट रिचेबल असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे शिवसेना फुटीच्या उंभरठ्यावर उभी आहे का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चीला जात आहे.

सेना नेते एकनाथ शिंदे काल सायंकाळपासून नॉट रिचेबल आहेत. कालच्या विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेची 11 मते फुटली आहेत. शिंदे गुजरातच्या सूरतमधील ग्रॅंड भगवती हॉटेलमध्ये असल्याची माहिती समोर येत आहे .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *