तब्बल १०० किलो वजनाचा ‘पाकट’ मासा ; अलिबाग समुद्र किनाऱ्यावर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२१ जून । खोल समुद्रातील मच्छीमारी बंद असल्याने अर्थिक विवंचनेत असलेल्या कोळी बांधवाला निसर्गाने दिलासा दिला आहे. काल अलिबाग समुद्र किनाऱ्यावर दिनेश नाखवा आणि दिपिकेश नाखवा या कोळी बाप बेट्यांना तब्बल शंभर किलो वजनाचा पाकट मासा (Stingray Fish Found In Alibaug) सापडला आहे. वाघ्या पाकट नावाचा हा मासा असून अलिबागच्या कुलाबा किल्ल्याच्या मागील भागात मासेमारी करत असताना हा मासा सापडला. या माशाचे वजन तब्बल १०० किलो इतके असून ह्या माशाने नाखवा यांना १५ हजार रुपये एवढी किंमत मिळू शकते. हा मासा मुंबईतील व्यापाऱ्यांना विकण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Alibaug Latest News)

पाकट माशाचे मांस खाल्ले जाते. त्याच्या यकृतापासून आणि शरीरापासून तेल मिळवितात. त्यांना अनुक्रमे यकृत तेल आणि शरीर तेल म्हणतात. यकृत तेलात अ आणि ड ही जीवनसत्त्वे असतात. शरीर तेलाचा उपयोग वंगण, खाद्यतेल आणि साबण तयार करण्यासाठी केला जातो. त्यांच्या त्वचेपासून कमाविलेले कातडे विविध प्रकारे वापरतात. पावसाळ्यात मुंबईच्या किनाऱ्‍याला पाकट मोठ्या संख्येने आढळतात. पाकटाच्या नांगीने केलेल्या इजांमुळे माणसे जखमी झाल्याच्या अनेक घटना घडत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *