महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२१ जून । एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे काही आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली. एकनाथ शिंदे शिवसेना आमदारांसह रात्री उशिरा सूरतच्या मेरिडियन हॉटेलमध्ये पोहोचले आणि तिथं त्यांची भाजप नेत्यांशी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे यानंतर होणाऱ्या राजकीय घडामोडींकडे आता लक्ष लागलं आहे.
नॉट रिचेबल आमदार :
साताऱ्याचे आमदार महेश शिंदे
सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील
उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले
पंराड्याचे आमदार तानाजी सावंत
बुलढाण्याचे आमदार संजय रायमूलकर
मेहकरचे आमदार संजय गायकवाड
बाळापूरचे आमदार नितीन देशमुखांचा मोबाईल बंद आहे
सिल्लोडचे आमदार आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार
पैठणचे आमदार आणि राज्यमंत्री संदिपान भुमरे
औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट
कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत
वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे
भुदरगडचे आमदार प्रकाश आबिटकर
महाडचे भरत गोगावले