![]()
महाराष्ट्र २४ । दि.२१ जून । उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी:-सलमान मुल्ला । उस्मानाबाद । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला होता. यावर विस्तृत चर्चा झाल्यानंतर डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.
भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यांमध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. अगदी प्राचीन काळापासून ऋषीमुनी, साधुसंत यांनी वेळोवेळी योगाचे महत्त्व, त्याचे फायदे आणि त्याची गरज पटवून दिलेली आहे. आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तर तंदरुस्त ठेवू शकतो; शिवाय मनावरही चांगले संस्कार करू शकतो.तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग, असे म्हणता येईल.

आज जागतिक योग दिनानिमित्त प्रभाग क्रमांक 6 मध्ये योगा मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आला. योगा प्रशिक्षक ॲड. भाग्यश्री मॅडम यांनी अत्यंत सोप्या भाषेत योगाचे महत्त्व आजच्या धावपळीच्या दिवसात किती महत्वाचे आहे हे पटवून दिले. योगाची प्रात्यक्षिके त्यांनी सर्वांकडून हसतखेळत करुन घेतली. प्रभागातील महिला आणि पुरुषांनी तसेच भाजपा चे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजे निंबाळकर,भाजपा महिला अध्यक्ष सौ. अर्चना अंबुरे,शहराध्यक्ष राहुल काकडे, उपशाहराध्यक्ष संदीप इंगळे, युवा मोर्चा अध्यक्ष सुजित साळुंके, प्रीतम मुंडे, पांडुरंग लाटे, शेषेराव उंबरे,अंबुरे सर,राजेश मुंडे,सौ.ढगारे मॅडम, सौ ऋतुजा भोसले ,सौ.आवारे मॅडम, सौ.गायकवाड मॅडम,सौ देशमुख ताई,सौ, शिंदे ताई,अक्षय अंकुशे, आकाश साबळे,सुनील पंगूडवाले,आदी प्रभागातील नागरिक उपस्थित होते.