मनधरणी करण्यासाठी पोहोचला उद्धव ठाकरेंचा खास माणूस, पण शिंदेंनी दिला निरोप

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२१ जून । विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेत (shivsena) भूकंप आला आहे. एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी शिवसेनेचे नेते आणि मुख्यमंत्री ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर सुरतमध्ये पोहोचले आहे.

एकनाथ शिंदे 21 आमदारांना घेऊन सुरतमधील हॉटेलमध्ये थांबले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे एकच शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. अखेरीस एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर हे सुरतमध्ये पोहोचले आहे. मिलिंद नार्वेकर यांनी हॉटेलवर जाऊन शिंदे यांची भेट घेतली. पण एकनाथ शिंदे यांची अट आहे की ते थेट मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे.

दरम्यान, शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने शिवसेनेच्या सर्व मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांना वर्षा बंगल्यावर बैठकीला बोलावले आहे. या बैठकीच्या निमित्ताने किती आमदार आपल्यासोबत आहे, याची गणना केली जाईल. संख्याबळ किती आहे, हे सिद्ध केलं जाईल. वर्षा बंगल्यावर शिवसेनेचे 35 आमदार असल्याची मुख्यमंत्री कार्यालयाने माहिती दिली आहे.

त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत 20 शिवसेनेचे आमदार असल्याचे स्पष्ट झालं आहे. तसंच एक अपक्ष आमदार सुद्धा शिंदेंच्या सोबत आहे. त्यामुळे एकूण संख्या 21 वर पोहोचली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *